Thursday, November 24, 2016

पुण्यात विनामूल्य मोडी प्रशिक्षण वर्ग

श्री
मोडी शिकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच मोडी लिपी शिकण्याची उत्सुकता आहे. पुढील काळात मोडी लिपी येणे हे उत्पन्नाचे साधनही बनू शकते. याच्या काही योजना तयार होत आहेत. मराठी साम्राज्याचा मोडी कागदांमध्ये दडलेला इतिहास समोर यावा यासाठी मोडी लिपी शिकणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारत इतिहास संशोधक मंडळाने विनामूल्य मोडी प्रशिक्षण वर्ग घेण्याची योजना आखली आहे.
२ डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळात सकाळी 10.30 ते 11.30 आणि सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळात हे वर्ग सदाशिव पेठेत भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वास्तूत होणार आहेत. याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, यासाठी हे आवाहन.

संपर्कासाठी - 9822251014 किंवा 9823079087 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.

ज्यांना प्रशिक्षण वर्गाला जाता येणार नाही त्यांच्यासाठी युट्यूबवर या लिंकवर मोडी प्रशिक्षण उपलब्ध आहे.
 https://www.youtube.com/user/amitsg1
पुण्याचे मोडी तज्ज्ञ व इतिहास संशोधक मंदार लवाटे युट्यूबच्या माध्यमातून मोडी लिपी शिकवित आहेत.